GET IN TOUCH
कोंकण म्हटलं कि पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी येतात...सुंदर सुंदर समुद्र किनारे, तीर्थक्षेत्र, आंबा, काजू, फणस, कोकम, कोकम सरबत, कोकम आगळ, मालवणी खाजे, खडखडे लाडू, कोंबडी वडे, सावंतवाडीची जगप्रसिद्ध खेळणी, कोकणामधील पारंपरिक देवपूजा, शिमगा, गणेश उत्सव, पालखी सोहळा, आंगणेवाडीची जत्रा आणि त्या पेक्षा मनाने सुंदर असणारा कोंकणी माणूस....मुंबईच्या भाषेमध्ये म्हणायचे तर चाकरमनी...
कोंकणी माणूस गावाकडून मुंबईला आला आणि तो मुंबईकर झाला. पण कधी कोकणाची ओढ सोडू शकला नाही. कोंकणी खाद्यपदार्थाची सदैव त्याला आवड. मुंबई पासून ५२० किलोमीटर जाऊन तो त्याच्या आवडी पूर्ण करू शकत नाही. त्या कोकणी, मराठी, मालवणी माणसासाठी, मी कोंकण अमृत फूड प्रॉडक्ट्स, गोरेगाव (मुंबई) हा व्यवसाय सुरू केला. त्या कोकणी माणसासाठी त्याच्या आवडीचे कोकणी पदार्थ त्याच्या घरी घरपोच पोहोचवण्याचे काम मी, कोकण अमृत फूड प्रॉडक्ट्स करत आहे.
सर्वानी एकदा नक्की अवश्य भेट देवून मालवणी मेव्याचा आस्वाद घ्यावा. आम्ही आपणा सर्वांच्या सेवेत सदैव तत्पर आहोत. आपली ऑर्डर त्वरित नोंदवा आणि आमच्या उत्पादनांचा आणि सेवेचा अनुभव सांगा. वाट पाहत आहे.........