LOGO PNG

           मी मालवणी, मी कोंकणी, मी भंडारी, मी मराठा, मी कुणबी,                     मी अमुक,   मी तमुक.....पण मी चाकरमनी.

कोंकण म्हटलं कि पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी येतात...सुंदर सुंदर समुद्र किनारे, तीर्थक्षेत्र, आंबा, काजू, फणस, कोकम, कोकम सरबत, कोकम आगळ, मालवणी खाजे, खडखडे लाडू, कोंबडी वडे, सावंतवाडीची जगप्रसिद्ध खेळणी, कोकणामधील पारंपरिक देवपूजा, शिमगा, गणेश उत्सव, पालखी सोहळा, आंगणेवाडीची जत्रा आणि त्या पेक्षा मनाने सुंदर असणारा कोंकणी माणूस....मुंबईच्या भाषेमध्ये म्हणायचे तर चाकरमनी.

contact me

मला अभिमान आहे कि माझ्या कोकणी माणसाची आवड जपण्यासाठी प्रयत्न्य करत आहे.

कोंकणी माणूस गावाकडून मुंबईला आला आणि तो मुंबईकर झाला. पण कधी कोकणाची ओढ सोडू शकला नाही. कोंकणी खाद्यपदार्थाची सदैव त्याला आवड.  मुंबई पासून ५२० किलोमीटर जाऊन तो त्याच्या आवडी पूर्ण करू शकत नाही.  त्या कोकणी, मराठी, मालवणी माणसासाठी,  मी कोंकण अमृत फूड प्रॉडक्ट्स, गोरेगाव (मुंबई) हा व्यवसाय सुरू केला. त्या कोकणी माणसासाठी त्याच्या आवडीचे कोकणी पदार्थ त्याच्या घरी घरपोच पोहोचवण्याचे काम मी, कोकण अमृत फूड प्रॉडक्ट्स करत आहे.
LOGO PNG
sawantwadi khelani

आमचा उद्देश

कोकणातील सर्व प्रकारचे दर्जेदार उत्पादने- उखळीत कुटलेले मालवणी घरगुती मसाले,जात्यावर दळलेली पीठे, घरगुती लोणचे, मुखवास, आवळा कँडी, इत्यादी केमिकल विहरित घरगुती सरबते, कोकम, आगळ, काजू  व  बरेच काही....कोकणातील सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध करुन देत आहोत.
कोकणातील ताजेतवाने आणि दर्जेदार उत्पादने देण्याचा उद्देश आहे. कोकणातील उत्पादनांच्या चवीची अनेक वर्षांपासून प्रशंसा करणाऱ्या अंतिम ग्राहकांपर्यंत आम्ही उत्पादनांचा ताजेपणा आणतो.
आमच्या उत्पादन सूचीमध्ये कोकम सिरप, विशेष घटकांसह मिश्रित हाताने बनवलेले मसाले आणि सिंधुदुर्गच्या मालवण परिसरात भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. आम्ही उद्योगातील काही नामांकित आणि पात्र उत्पादकांकडून आमची पारंपारिकपणे प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने घेतो.
सर्वानी एकदा नक्की अवश्य भेट देवून मालवणी मेव्याचा आस्वाद घ्यावा. आम्ही आपणा सर्वांच्या सेवेत सदैव तत्पर आहोत...

आमचा प्रयत्न

श्रीमती वंदना शंकर वाडेकर (लक्ष्मी रामानंद बांदेकर ) एक होतकरू व्यावसायिक.  हुशार आणि अतिशय व्यावहारिक असे हे व्यक्तीमत्व.  वंदना वाडेकर आणि रामानंद बांदेकर यांनी अथक परिश्रमाने आपल्या मराठी मालवणी कोकणी माणसासाठी मोठ्या जिद्दीने कोकण अमृत फूड प्रॉडक्ट्स चे बस्तान गोरेगाव पूर्व मुंबई येथे बसवले आहे. कोंकणी माणसाला कोंकणमधील खाद्य पदार्थ सहजपणे मुंबई मध्ये किंवा घरपोच उपलब्ध व्हावेत हा त्यांचा कोंकण अमृत फूड प्रॉडक्ट्स सुरू करण्या मागचा मुख्य उद्देश आहे. सावंतवाडी ते पनवेल तसेच मुंबई मधील काही भाग येथील कोकणी माणसाला व्यवसाय मिळावा हा देखील त्या मागचा दुसरा अति महत्वाचा हेतू आहें.
व्यवसाय म्हणजे लागत भांडवल आणि या मुख्य अडचणींवर मात करून त्यांनी हे दुकान सुरू केला आहे. गोरेगाव मधील लोकांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे पुढील काही दिवसामध्ये अशीच काही दुकाने मुंबई शहर आणि उपनगर मध्ये सुरू करून त्यांच्या सारखे अनेक उद्योजक निर्माण करणे हा देखील एक प्रामाणिक प्रयोग ते करणार आहेत पाहूया मुंबई शहर त्यांना कसा साथ देते ?.
WhatsApp Image 2023-02-21 at 5.56.21 AM

MY FUTURE NUMBERS TO SPEAK

1
OUTLETS
1
PRODUCTS
1
PARTNERS
1
WORKFORCE

भविष्यातील घडामोडी

लवकरच कोंकण अमृत फूड प्रॉडक्ट्स स्वतःच्या नावासहित काजू काजू प्रॉडक्ट्स आणि फ्लॅवोर काजू सुरू करत आहे तसेच चर्चगेट पासून विरार पर्यंत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून कर्जत पर्यंत नवीन ओउटलेट्स सुद्धा सुरू करत आहे .

WhatsApp Image 2023-07-16 at 12.16.31 PM (1)
WhatsApp Image 2023-07-16 at 12.16.29 PM
WhatsApp Image 2023-07-16 at 12.16.31 PM (2)
cashew with cover
WhatsApp Image 2023-07-16 at 12.32.27 PM
WhatsApp Image 2023-07-16 at 12.34.57 PM
WhatsApp Image 2023-07-16 at 12.37.33 PM
WhatsApp Image 2023-07-16 at 12.38.09 PM
READ MORE

SUBSCRIBE TO MY DAILY UPDATES

Get access to my latest products by joining the weekly newsletter